ई-प्रमाणपत्र
सप्तसूत्री ई-प्रतिज्ञा प्रमाणपत्र डाउनलोड करा
सप्तसूत्रीचे पालन करून खालील माहिती भरा. प्रमाणपत्र तुमच्या ईमेलवर पाठवले जाईल.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पनवेल महानगरपालिकेची सप्तसूत्री
-
श्री गणेशाची मूर्ती लाल मातीची किंवा शाडूची असावी.
-
पर्यावरणपूरक वारसा नव्या पिढीला देत आपल्या घरातील लहानग्यांच्या हस्ते मातीची मूर्ती घडवून त्याचीच प्रतिष्ठापना करावी.
-
मूर्तीना शक्यतो नैसर्गिक रंगच लावावेत.
-
घरातील मखर, आरास, सजावट हे कापड, कागद किंवा फुलांचे करावे.
-
डीजे टाळून आपल्या इष्टदेवतेची आराधना मंगलमय संगीताने व कमी आवाजात करावी.
-
नैसर्गिक जलस्त्रोतांचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने घरीच एका मोठ्या ड्रममध्ये पाण्यात मंगलद्रव्ये घालून त्यामध्ये श्रींचे विसर्जन करावे.
-
गणेश विसर्जनाच्या वेळेस आणलेले निर्माल्य हे निर्माल्य कलशातच कागदी पिशवीतून टाकावे.