पर्यावरणपूरक मातीचा बाप्पा

उत्सव गणरायाचा जागर पर्यावरणाचा

सार्वजनिक व घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

स्पर्धेसाठी नोंदणी करा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पनवेल महानगरपालिकेची सप्तसूत्री:

परंपरा जपून आणि पर्यावरणाचे रक्षण करून गणेशोत्सव जबाबदारीने साजरा करण्यासाठी पनवेल महानगरपालिका कटिबद्ध आहे.

  1. १

    श्री गणेशाची मूर्ती लाल मातीची किंवा शाडूची असावी.

  2. २

    पर्यावरणपूरक वारसा नव्या पिढीला देत आपल्या घरातील लहानग्यांच्या हस्ते मातीची मूर्ती घडवून त्याचीच प्रतिष्ठापना करावी.

  3. ३

    मूर्तीना शक्यतो नैसर्गिक रंगच लावावेत.

  4. ४

    घरातील मखर, आरास, सजावट हे कापड, कागद किंवा फुलांचे करावे.

  5. ५

    डीजे टाळून आपल्या इष्टदेवतेची आराधना मंगलमय संगीताने व कमी आवाजात करावी.

  6. ६

    नैसर्गिक जलस्त्रोतांचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने घरीच एका मोठ्या ड्रममध्ये पाण्यात मंगलद्रव्ये घालून त्यामध्ये श्रींचे विसर्जन करावे.

  7. ७

    गणेश विसर्जनाच्या वेळेस आणलेले निर्माल्य हे निर्माल्य कलशातच कागदी पिशवीतून टाकावे.